Puran Poli

आजीची गुळाची पुरणपोळी

हरभरा डाळ आणि गुळाचे पुरण, मैद्याची सैल कणिक आणि तूप लावून भाजलेली पातळ पुरणपोळी.

Ingredients

Method

  1. कणिक हळद, मीठ आणि पाण्याने अतिशय सैल भिजवून वर तेल ओतून ३ तास ठेवा.
  2. डाळ मऊ शिजवून पाणी काढून ठेवा (आमटीसाठी). डाळीत गूळ घालून घट्ट होईपर्यंत ढवळत शिजवा.
  3. वेलची-जायफळ घालून पुरण गरम असतानाच पुरणयंत्रातून किंवा मिक्सरमधून बारीक करा.
  4. कणकेच्या लहान गोळ्यात मोठा पुरणाचा गोळा भरून तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने पातळ लाटा.
  5. तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून वरून तूप लावा. दूध किंवा कटाच्या आमटीसोबत वाढा.