आईचे उकडीचे मोदक
ओल्या नारळ-गुळाचे सारण आणि मऊ उकडीचे, कळ्या पाडलेले गणपतीचे मोदक.
Ingredients
- 2 cup ओले खोबरे (खवलेले)
- 1 cup गूळ (किसलेला)
- 0.5 tsp वेलची पूड
- 1 pinch जायफळ
- 1 tsp खसखस
- 1 cup तांदळाचे पीठ (आंबेमोहर)
- 1 cup पाणी
- 1 tsp तूप
- 1 pinch मीठ
Method
- कढईत खोबरे आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर गूळ विरघळेपर्यंत आणि सारण कोरडे होईपर्यंत ढवळा. वेलची, जायफळ घालून थंड करा.
- पाण्यात तूप आणि मीठ घालून उकळी आणा. पीठ घालून ढवळा, झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ येऊ द्या.
- उकड परातीत काढून गरम असतानाच ओल्या हाताने मऊ मळा.
- लिंबाएवढा गोळा घेऊन वाटी करा, कळ्या पाडा, सारण भरून कळ्या एकत्र करून टोक बंद करा.
- मोदकपात्रात केळीच्या पानावर ठेवून १०–१२ मिनिटे वाफवा. वरून साजूक तूप घालून नैवेद्य दाखवा.